तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वाणेगाव येथिल गट नं 84 मध्ये रिन्यु एनर्जी सोलुशन प्रा. ली. कंपनीचे कर्मचारी अनाधिकृतपणे आमच्या संमती शिवाय पवनक्कीचे कामकाज करुन ,खंडणीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी देत आहेत. आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी वाणेगाव येथील गिरी कुंटुंबाने जिल्हाधिकारी जिपोअ यांना निवेदन देवुन केली आहे.
तुळजापूर, तालुक्यातील वाणेगाव येथील रेन्यू वायू उर्जा कंपणीची पवनचक्क 83, व 82 या गटामध्ये आम्ही वहीवाट असलेल्या जमीनीमध्ये अतिक्रमण करून बसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. व तसेच 82 या गटामध्ये जनावरांचा गोटा व कोरोना काळापासून गट नं 82 मध्ये आम्ही घर करून राहत आहोत. तरी पवनचक्की बसवण्यासंदर्भात आम्हाला कसलीही सूचना दिली नाही व आम्हाला कळवले नाही. व सदर वरील नमुद गट नं 82 व 83 या गटा मध्ये आम्ही स्वतंत्र लाईटचे डीपी व खांब आम्ही स्वःखर्चाने बसवलेले होते व ते खांब कुठलीही पुर्व सूचना न देता काडुन टाकले आहेत. व तसेच खांब व विद्युत तारेची चोरी केलेली आहे. त्यामुळे लाईट चे कनेक्शन कट झाल्याने व तसेच बोर बंद असल्याने शेतातील पीकाला पाणी न मिळाल्याने पीकाचे नुकसान होत आहे. तसेच गट नं 84 मध्ये बसवत असलेली पवनचक्कीचा पंखा पुर्ण गट नं 83 मध्ये आमच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रामध्ये 21 फूट येत असून त्यामुळे पीकाचे नुकसान होणार आहे. आम्हाला तुम्ही जर आमचे पवनचक्की चे काम आडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला जीवे मारण्यास मागे पुढे बघनार नाही व अपशब्द व आपमानजक भाषा वापरुन आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे आमच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. तरी या प्रकरणी चौकशी करुन रिन्यु ग्रीन एनर्जी सोलूशन प्रा. लि. कंपनीचे कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करुन मला न्याय मिळावा, अशी सोनाली गणेश गिरी, सावित्री दिनेश गिरी, दिनेश नागेंद्र गिरी यांनी केली आहे.