भुम (प्रतिनिधी)- रविंद्र हायस्कूलचे 11 विद्यार्थी ऑल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये खराडे संयोगिता संदीप, डोके आर्यन सुखदेव, हाडुळे अनुज मुकुंद, घाडगे आरव अमोल, गायकवाड श्रेयस प्रमितकुमार 189, साबळे अविष्कार महावीर, रेपाळ समर्थ हनुमंत, जेकटे किरण सुधीर, सय्यद फरहान शोयब, गुंड यश दत्तात्रय, भोसले रुद्र बळीराम हे उत्तीर्ण झाले आहेत.
या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक सुधीर पालखे, रेश्मा केळे , प्रवीण राऊत, सचिन कलमे यांचे संस्थेचे सचिव आर. डी. सुळ, मुख्याध्यापक भागवत लोकरे, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे, धनंजय पवार, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, यांनी अभिनंदन केले.