तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी ड्रग्ज प्रकरणी फरार असलेले आबासाहेब पवार यास अखेर शनिवार दि. 17 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथुन ताब्यात घेवुन त्यांना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार असलेल्या आरोपीपैकी सेवन गटातील संशयित आरोपी आबासाहेब पवार यास पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी दि. 17 मे रात्री अटक केली. दरम्यान या प्रकरणात आत्तापर्यंत अटक झालेल्या संशयित आरोपींची संख्या 17 झाली आहे. अजून 19 आरोपी फरार आहेत. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख व तामलवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे करत आहेत. आबा पवार ची अटक तपासाचा दृष्टीने महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.