तुळजापूर (प्रतिनिधी)-  भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे समर्थक युवा नेते विनोद गंगणे यांची ड्रग्ज प्रकरणात जामिन अखेर शनिवार दि. 31 मे रोजी न्यायालयात मंजुर झाली आहे. 

तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत सेवन गटातील फरार आरोपी विनोद गंगणे यांना पुढील सुनावणी पर्यंत अटकपूर्व जामीन मंजुर करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी पुढील सुनावणी पर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज मंजुर केला आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणात हा पहिला जामीन असुन त्यामुळे गंगणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे येथील ऍड. व्ही. व्ही. दुशिंग यांनी बाजु मांडली. त्यानंतर जामीन मंजुर करण्यात आला. धाराशिव पोलिसांनी तामलवाडी येथे 14 फेब्रुवारी रोजी कारवाई करीत 3 जणांना ड्रग्जसह रंगेहात अटक केली. 25 मार्च रोजी पोलिसांनी आरोपी म्हणुन विनोद उर्फ पिटू विलास गंगणे यांना आरोपी केले. तेव्हापासुन ते फरार होते. तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 37 आरोपी पैकी 27 आरोपी तस्कर गटात तर 10 आरोपी सेवन गटात आहेत. त्यातील 17 तस्कर व 2 सेवन गटातील असे 19 आरोपी अटकेत आहेत. तर 17 आरोपी फरार आहेत. एकाला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. तस्कर गटातील 27 पैकी 10 आरोपी फरार आहेत. तर सेवन गटातील 10 पैकी 7 आरोपी फरार आहेत. 

 
Top