तुळजापूर (प्रतिनिधी)- सुप्रसिद्ध सिनेअभिनेते देवदत्त नागे यांनी आज श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
झी मराठीची लोकप्रिय मालिका जय मल्हार मध्ये त्यांनी श्री खंडेरायांची भूमिका केली होती. उदे ग आंबे मालिकेत भगवान शंकर यांची भूमिका साकारली. वीर शिवाजी, लागी तुझसे लगन, बाजीराव मस्तानी, देवयानी इत्यादी मालिका तसेच संघर्ष, तानाजी, सत्यमेव जयते इत्यादी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. या दर्शनाने साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन पूर्ण करण्याची इच्छा पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. मंदिर संस्थानच्या व्यवस्थेमुळे उत्तम दर्शन झाल्याचे सांगून समाधान व्यक्त केले. यावेळी मंदिर संस्थान कडून त्यांचा श्रीतुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.