तुळजापूर (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी आज सकाळी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन देवीच्या चरणी नतमस्तक होत कुलधर्म आणि कुलाचार पूर्ण केले.

यावेळी न्यायमूर्ती सांबरे यांनी श्री तुळजाभवानी देवीची ओटी भरली. मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा देवीची प्रतिमा, कवड्यांची माळ आणि महावस्त्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी धाराशिवचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश स्वप्नील खाटी, तहसीलदार व व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पराडे, तसेच मंदिर संस्थानाचे कर्मचारी उपस्थित होते.

 
Top