धाराशिव (प्रतिनिधी)-  महसूल प्रशासन हा जिल्हा प्रशासनाचा कणा असून,प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या सेवा वेळेत आणि अचूक पद्धतीने पुरवणे ही जबाबदारी महसूल यंत्रणेवर आहे.त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी अधिक कार्यक्षमतेने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील विविध महसूलविषयक बाबींचा आढावा आयोजित बैठकीत घेतांना त्यांनी दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, संतोष राऊत,प्रविण धरमकर,भुम उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील,उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार,कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील,सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साकळे,धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव, संबंधित नायब तहसीलदार व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले की,महसूल प्रशासन हा जिल्हा प्रशासनाचा कणा असून, प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या सेवा वेळेत आणि अचूक पद्धतीने पुरवणे ही जबाबदारी महसूल यंत्रणेवर आहे. त्यामुळे संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी अधिक कार्यक्षमतेने काम करावे, असे ते म्हणाले.


पवनचक्की व सौरऊर्जा ते दफन भूमीपर्यत चर्चा 

बैठकीत ॲग्रीस्टॅक,पवनचक्की व सौरऊर्जा, दंडणिय प्रकरणे, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप, ई-केवायसी शेतकरी आत्महत्या प्रकरणे, ई-फेरफार,ई-चावडी, डी.एस.डी.डाटा साईन न झालेल्या 7/12 चा अहवाल, ई-हक्क प्रणाली, ओडीसी अहवाल, जीवंत सातबारा मोहिम, कलम 155 आदेश, शेतरस्ते, अर्धन्यायिक प्रकरणे, दहन-दफन भूमी आदी बाबींचे प्रकरणे निकाली काढण्याबाबत विशेष चर्चा झाली. 


प्रलंबित कामामुळे नागरिकांची गैरसोय

जिल्ह्यातील अनेक फेरफार प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना लवकरात लवकर प्रलंबित प्रकरणांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, फेरफारांची विलंबित नोंदणीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे लोकामध्ये नाराजी पसरते हे सहन केले जाणार नाही.असे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले. 

 
Top