तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरात भाविकांच्या वास्तव्यासाठी बांधण्यात आलेल्या शुक्रवार पेठ आठवडा बाजार येथील सुरेख स्मृती रेस्ट हाऊस आणि कमान वेस या मध्यवर्ती भागातील सराया धर्मशाळा भाविक, पुजारी व नागरिकांसाठी पुन्हा सुरू करण्याची मागणी जाणता राजा युवा मंचाने मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांना निवेदन देवुन केली.
निवेदनात म्हटले आहे कि देविदर्शनार्थ दररोज हजारो भाविक येतात माञ त्यांना वास्तव्य करण्यासाठी महागडे लाँज, धर्मशाळामध्ये थांबवे लागते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सराया धर्र्मशाळा असुन माञ ती मागील काही काळापासून बंद आहे. तसेच सुरेख स्मृती व रेस्ट हाऊस या धर्मशाळा नगरपरीषद दुर्लक्ष मुळे कचराने व्यापुन गेल्या आहेत. तरी या त्वरीत सुरू कराव्यात. अशी मागणी यात केली असुन हे निवेदन सुर्दशन वाघमारे, अनमोल साळुंके, सुमीत साळुंके, अँड शुभम रत्नाकर खोले, कौस्तुभ जेवळीकर, दत्ता बेंद्रे, विशाल साखरे, संकेत मस्के, नागेश किवडे, अदित्य शेखर सानेके, तानाजी साळुंके, शशीकांत मस्के यांचा यावर स्वाक्षरी आहेत.