तुळजापूर (प्रतिनिधी)- खरीप हंगामास सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांमार्फत डीएपी खताची मागणी मोठया प्रमाणात असते. डीएपी खतामध्ये 18% नत्र व 46% स्फुरद असून, हे एकत्रित खत आहे. मात्र, याचा पर्याय म्हणून सिंगल सुपर सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट व इतर संयुक्त खते वापरता येऊ

शकतात. शेतकऱ्यांनी डीएपी खतावर अवलंबून न राहता त्याला पर्यायी खते वापरणे आवश्यक आहे.

डीएपी खताकरीता पुढील पर्याय आहेत:

सिंगल सुपर फॉस्फेट : यात 16% स्फुरद, 11% गंधक असतो. गंधकामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारते. ट्रिपल सुपर फॉस्फेट: यामध्ये 46% स्फुरद असून, यामध्ये नत्र नसतो. त्यामुळे यासोबत युरिया खत एकत्र वापरावे लागते. संयुक्त खते : जसे की 10:26:26, 12:32:16, 20:20:0:13 या खतांमध्ये नत्र व स्फुरद दोन्ही आढळतात. यांचा उपयोग पीक गरजेनुसार करता येतो. चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपीवर अवलंबून न राहता, बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करावा. जिल्हयात खतांचा पुरवठा सुरळीत असून, पर्यायी खतांचा योग्य वापर केल्यास पीक उत्पादनात वाढच होईल. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, शेतकऱ्यांनी डीएपी खतावर अवलंबून न राहता त्याला पर्यायी खते वापरावीत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  रविंद्र माने यांचे वतीने करण्यात येत आहे.

 
Top