धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नागरिकांसाठी आज एक महत्त्वाचा क्षण ठरलेल्या धाराशिवच्या नूतन बसस्थानकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) वतीने उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक बसस्थानकाचे उद्घाटन परिवहन मंत्री, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईला विमानाने नियोजित वेळेत जायचे असल्यामुळे पालकमंत्र्यांनी धाराशिव बस स्थानकाचे उद्घाटन उरकले असे यावेळी बोलले जात आहे नवीन धाराशिव बस स्थानक प्रवाशांच्या सेवेत नेमके कधी येईल हे सांगता येणार नाही
यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधिक्षक संजय जाधव, एस.टी महामंडळाच्या उपमहाव्यपस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांच्यासह राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या नुतन इमारतीत महिलांसाठी हिरकणी कक्ष, सुसज्ज स्वच्छतागृह, अपंगांसाठी स्वच्छतागृह, रॅम्पची व्यवस्था, टॅकटाईल्स, सर्व प्रवाश्यांसाठी सुसज्ज प्रतिक्षालय, चौकशी कक्ष, पाण्याची व्यवस्था, कँटीन, चालक-वाहक विश्रांतीगृह असून वाणिज्य आस्थापनेसाठी 1 जेनेरिक मेडीकल , 5 दुकाने बांधण्यात आली आहेत. बसस्थानकात 22 फलाट आहेत. सध्या बसस्थानकातील फरशी काम, प्रसाधनगृहाचे प्लास्टर, पाणीव्यवस्था करणे, बसस्थानकाची रंगरंगोटी करणे, दरवाजे खिडक्या बसविणे, प्रवासी प्रतिक्षालयामध्ये सिलिंग बसविणे इ. कामे पुर्ण झालेली आहेत. तसेच वाहनतळाचे काँक्रीटीकरण एम.आय.डी.सी.मार्फत करण्यात येत आहे. या बस स्थानकाचे घाईगडबडीत उद्घाटनवर असल्यामुळे लोकात नाराजी आहे बस स्थानकात अनेक कामे होणे बाकी आहे अशा असताना उद्घाटनाची घाई का केली अशी विचार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स काय-धाराशिव चे नवीन बस स्थानकाचे ज्यावेळेस काम जाहीर करण्यात आले होते त्यावेळी बीआओटी तत्त्वावरील शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचेही निश्चित झाले होते परंतु त्याबाबत पालकमंत्री यांनी लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले.