तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोड भागात शेकडो कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते कामे चालु आहेत. माञ हे काम रखडल्याने  अवकाळी पाऊस होताच पाणी थांबुन ते घराचा दारापर्यत पोहचल्याने या भागातील रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. अवकाळी पावसात अशी परिस्थिती तर पावसाळ्यात कशी राहील याची चिंता येथील रहिवाशांना लागली आहे.

सध्या याच भागातील अजिंक्य रेसिडेंन्सी मधील हनुमाननगर सखल भागात रस्ते चिखलमय झाले आहेत. सध्या रस्ते करताना पाणी निचरण व्यवस्था न केल्याने घरासमोर अंगणात दोन दोनफुट थांबत असल्याने या भागातील रहिवाशांचे हाल होत असल्याने नगरपरीषदने पाणी थांबण्याच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करुन येथील रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवर मोठ्या प्रमाणात नव्याने वस्ती होत आहे. या भागात 158 कोटी रुपये निधीतुन सिमेंट रस्ते, नाल्या काम केले जात आहे. येथील अजिंक्य रेसिडेन्सी येथे आजुबाजुचा भागातील पाणी येवुन थांबत आहे. यातुनच रहिवाशांना ये-जा करावी लागत आहे. सदरील समस्ये बाबतीत नगरपरीषद अभियंत्याला सांगितले असता पाहणीस येतो सांगुन येण्यास टाळाटाळ करीत आहेत. या रस्त्यावर यापुर्वी मुरम टाकला होता, तो कुठे गायब झाला. तो नगरपरीषद फंडातुन टाकला का! टाकला असेल तर किती लाखाचा टाकला याची चौकशी करुन दोषी अंती अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी या भागातील रहिवाशांमधुन केली जात आहे.

 
Top