कळंब (प्रतिनिधी)- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव 2025 च्या अनुषंगाने अहिल्यादेवींच्या जिवनावर आधारित चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याला कळंब शहर व तालुक्यातील विविध शाळांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते गुरूवार दि. 29 मे 2025 रोजी जय भवानी फंक्शन हॉल, परळी रोड, कळंब येथे सकाळी ठिक 9. 30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. 

या बरोबरच एसएससी परिक्षेत पैकीच्या पैकी म्हणजे 100% गुण मिळविणारे विद्यार्थी, निकालाची उज्वल परंपरा राखणा-या शाळा, विविध अभ्यासक्रमासाठी निवड झालेले विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, क्रिडा क्षेत्रात मिळविलेले विषेश प्रावीण्य,  आदींचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी गुणवंतांना प्रोत्साहित करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आयोजकातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top