कळंब (प्रतिनिधी)- लोकनेते कैलासवासी लिंबराज आबा गायकवाड यांच्या धर्मपत्नी जिजाबाई लिंबराजआबा गायकवाड (वय ८४)यांचे दिनांक ५ मे२०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराचा विधी दिनांक ६ मे २०२५ रोजी त्यांच्या मूळगावी तालुक्यातील भाटशिरपूरा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जिजाबाई यांचं आयुष्यअत्यंत शांत, संयमी , कुटुंबवत्सल आणि समाजहिताचे व्यक्तिमत्त्वाचं उत्तम उदाहरण होतं. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. परिवारावर आलेल्या या दुःखद प्रसंगी गावकरी, नातेवाईक व सामाजिक राजकीय शैक्षणिक ,कृषी आदी क्षेत्रातील हितचिंतकांनी श्रद्धांजली वाहून आपल्या भावना व्यक्त केल्या.