तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सांगवी काटी येथील विद्यार्थी ओमराजे संतोष मगर याने दहावी परीक्षेत 96.20 गुण प्राप्त करून सरस्वती विद्यालयातुन प्रथम क्रमांक पटकावला. तर रजनी दादाराव मगर हीने 93 टक्के गुण मिळवून यश संपादन केले.
या यशाबद्दल त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ व ग्रामस्थांचा वतीने सरपंच अमोल पाटील यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी महेश पाटील, अण्णासाहेब मगर, रणजित पाटील, सतीश शेळके, अखिल मुलानी, विश्वजीत पाटील, आबा पाटील, शंकर मगर, साधु शिंदे, ज्ञानेश्वर मगर, उषाताई मगर, दादाराव मगर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.