भूम (प्रतिनिधी)- शहरातील नागरिकांना बंद अवस्थेत असलेल्या सुविधा पूर्ववत चालू करून सोयी सुविधा दयाव्यात यासाठी भा.ज.पा.च्यावतीने नगर पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
शुक्रवार दिनांक 2 मे 2025 रोजी भाजपाचे विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मार्ग दर्शनाखाली व तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर यांच्या पुढाकाराने शहरातील ज्वलंत प्रश्नाच्या संदर्भात भूम नगर पालिका मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनातून प्रामुख्याने शहरातील प्रत्येक वार्डात असणारे शौचालय हे अंत्यत वाईट अवस्थेत आहेत त्याची देखभाल प्रशासनाकडून व्यवस्थित करून दुर्गंधी मूकत्त परिसर करावा, मेन रोड परिसरातील स्ट्रीट लाईट बंद आहेत. त्यामुळे शहरात चोरी होऊन व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. बंद अवस्थेत असलेली स्ट्रीट लाईट पूर्व चालू करावी. शहरातील प्रमुख चौकात व परिसरात लाखो रुपये खर्च करुन जे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले ते सुद्धा गेल्या अनेक कालावधीपासून बंद आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आज रोजी दिखावूपणाचे साधन बनले आहे. ते तात्काळ सुरू करावे. याशिवाय शहरातील ज्या स्मशान भूमी आहेत त्या ठिकाणी पाणी, लाईट नाही त्याचा देखील नागरिकांना त्रास होत आहे. तेथील बंद पडलेला पाण्याचा बोर चालू करावा . आदी मागण्यांचा पाठपुरावा करण्यात आला.
भाजप पदाधिकारी निवेदन देण्यासाठी गेले असता प्रशासनाने भूम नगर पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी दिलेले असताना मुख्याधिकारी गैरहजर असल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. मागण्यांचे निवेदन कार्यकर्त्यांनी दरवाजावरती चिकटवून संताप व्यक्त केला.तसेच अगामी काही दिवसात शहरातील नागरिकांना योग्य सुखसुविधा न मिळाल्यास मुख्याधिकारी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले आहे. निवेदनावर तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर अ.जा.मोर्चा ता.अध्यक्ष प्रदीप साठे, ता.उपाध्यक्ष हेमंत देशमुख, ता. प्रसिद्धी प्रमुख शंकर खामक , युवा नेते आबासाहेब मस्कर, मुंकुद वाघमारे, सिद्धार्थ जाधव, निलेश शेळके, महादेव शेंडगे आदिची स्वाक्षरी आहे.