तुळजापूर (प्रतिनिधी)- मंगळवारी भाविकांची प्रचंड गर्दी असताना ही मंदीरात माञ स्वच्छते बाबतीत बोंबाबोंब दिसुन आली.
आज जिथे पिण्याचा पाण्याचे वाँटर कुलर आहेत तिथेच अस्वच्छता होती. आज ही मंदीरात छञपती शिवाजी महाराज दरवाजा जवळ पान मावा घावुन थुंकलेल्या रंगीत गलीछ भिंती भाविकांचा नजरेस येत आहेत. तसेच छञपती शिवाजी महाराज दरवाजा खालील भागात ही अस्वछता दिसुन येत मंदीरात कोपऱ्यावर गुटखा पुढ्या नजरेस येतात. राजमाता माँ जिजाऊ महाद्वार समोर तसेचविविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसुन आले. मंदीरात स्वच्छतेसाठी कोट्यावधी रुपयाचा ठेका दिला असताना मंदीर गर्दी दिवशी स्वच्छ नसेल तर स्वच्छते अभावी भाविकांना आरोग्य निगडीत समस्या निर्माण होणार असल्याने या अस्वच्छते बाबतीत भाविकांनी नाराजी व्यक्त केली. स्वच्छतेचे कोट्यावधी रुपये वाया जाणार असल्याने या प्रकरणी मंदीर समितीने स्वच्छते बाबतीत ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.