धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांचा गौरव करत सन 2023 -24 आणि सन 2024 -25 चे जिल्हा युवा पुरस्कार वितरीत करण्यात आले.हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिवसाच्या औचित्याने संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. प्रतापराव सरनाईक यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी जिल्हाधिकारी शोभा जाधव,तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सन 2023 - 24 चे पुरस्कारार्थी - युवक : श्री.गणेश विक्रम मुळे (मुळेवाडी,ता.धाराशिव),युवती : डॉ. गौरी विजय बागल (तांबरी विभाग,धाराशिव), नोंदणीकृत संस्था : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था,सारोळा (बु),सन 2024-25 चे पुरस्कारार्थी : युवक: श्री.विकास शंकर लोभे (कानेगाव,ता.लोहारा),युवती : श्रीमती अस्मिता रमेश शिंदे (शिंगोली,धाराशिव), नोंदणीकृत संस्था : श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्था, गोजवाडा (ता. वाशी) यांना देण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूपात युवक व युवतीस गौरवपत्र,सन्मानचिन्ह व रोख रक्कम 10 हजार रुपये तर संस्थेस गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम 50 हजार रुपये प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री.गणेश पवार,श्री.भैरवनाथ नाईकवाडी, कैलास लटके,अक्षय बिरादार, डॉ.शुभांगी रोकडे,डिंपल ठाकरे, विश्वास खंदारे,सुरेश वालवडकर,सुनील घोगरे,जान्हवी पेठे,किशोर भोकरे,सुरेश कळमकर व व्यंकटेश दंडे यांनी मोलाचे योगदान दिले.