धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत धाराशिव जिल्हातील युवांनी व नोदणीकृत संस्था श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्था गोजवाडा ता वाशी या संस्थेने आतापर्यन्त क्रीडा,सामाजिक, वृक्षलागवड,महिला सक्षमीकरण,कृषी,जलसंधारण,आर्थिकदुर्बल घटक,युवा विकास या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रतापराव सरनाईक, मंत्री, परिवहन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धाराशिव जिल्हा यांच्या शुभहस्ते व किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी, मैनाक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी, संजय जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक, श्रीमती शफकत आमना अपर पोलीस अधीक्षक व श्रीमती ज्योती पाटील अपर जिल्हाधिकारी, श्रीमती शोभा जाधव, निवासी जिल्हाधिकारी, श्रीकांत हरनाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिवस समारंभाच्या दिवसी जिल्हा युवा पुरस्कार संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष बिभीषण थोरबोले-पाटील व सचिव योगेश थोरबोले,नागेश राजुरे,अविनाश थोरबोले,पांडुरंग मुळे,अजिंक्य वराळे,ज्ञानेश्वर भुतेकर,निवृत्ती थोरबोले यांना गौरव पत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.