धाराशिव (प्रतिनिधी)-  महायुती सरकारचे 100 दिवस आपापसातील भांडणं आणि कुरघोड्या करण्यातच संपले. निवडणुकीला सामोरे जाताना दिलेली आश्वासने विसरून आता जनतेला आणि पत्रकारांवर दादागिरी करणारे हें सरकार शेतकरी, महिला आणि युवकांच्या डोळ्यात धुळफेक करत आहे. स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेणारं राज्य सरकार शेतकरी आत्महत्या, ड्रग्ज माफियाचा सुळसुळाट, दंगल, मारामारी आणि महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे डोळेझाक करतं आहे. त्यामुळे सरकार 100 दिवसाच्या कारभारात नापास अशी टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ता हनुमंत पवार यांनी केली आहे.

नवी गुंतवणूक नाही की नवे रोजगार नाहीत. कर्जमाफी नाही की भावांतर योजना नाही. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या मायमाउल्या असो की रोजगाराच्या शोधातील युवकांचे शहराकडे येणारे लोंढे असो, डोळेझाक करतं राहण्यातच हें सरकार धन्यता मानत आहे. नागरिकांच्या खऱ्या प्रश्नांकडे लक्ष नं देणाऱ्या सरकारमधील अनेक मंत्री, आमदार मात्र सामाजिक शांतता कशी भंग होईल यासाठी राबताना दिसतं आहेत. 

 
Top