परंडा (प्रतिनिधी)-  कराड जि.सातारा येथे होत असलेल्या 31 व्या आखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात परंडा येथील जेष्ठ साहित्यिक तुकाराम गंगावणे यांची निमंत्रीतात निवड झाली आहे. 

या संमेलानाचे स्व्राताध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार असून अध्यक्ष माजी राज्यपाल पाटील व पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील प्रमूख अतिथी असणार आहेत सदरील संमेलनाचे प्रमुख निमंत्रक डॉ. शरद गोरे यांनी परिश्रम घेतले आहे. दि.9 व 10 मे रोजी दोन दिवस आखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन मोठ्या दिमाखात पार पडणार असून परंड्यातील साहित्यिक तुकाराम गंगावणे गडंगणकार हे निमंत्रिक कवि राहणार असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top