तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री श्री रविशंकरजी यांच्या 69 व्या जन्मदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आर्ट ऑफ लिविंग परिवार तेर यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन ह.भ. प. दीपक महाराज खरात यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरास आर्ट ऑफ लिविंग संस्थेचे जागतिक ख्यातीचे टीटीपी टीचर अमोल वागळे यांनी सदिच्छा भेट दिली. या रक्तदान शिबिरासाठी श्रीकृष्ण ब्लड बँक उमरगा येथील डॉ. सागर पतंगे, विजय केवडकर, अजय रोडगे ,राहुल कोंबडे, शितल जाधव उपस्थित होते यावेळी 28 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग परिवारातील विजयसिंह फंड ,बालाजी भक्ते , नारायण साळुंखे, ओमप्रकाश नाईकवाडी बबन कोकरे, भाग्यश्री भक्ते, आशा गोरे, सुनिता पांचाळ, राधा कोकरे, रेश्मा साळुंखे, नवनाथ इंगळे,उषा इंगळे, यांनी प्रयत्न केले.