परंडा (प्रतिनिधी)- भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान च्या मुसक्या आवळून "ऑपरेशन सिंदुर" च्या माध्यमातून अतिशय चालाखीने यशस्वी करून दाखवले. या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ पायी "तिरंगा यात्रा" दि. २३ मे २०२५ रोजी सकाळी ०९.३० वा. महाराणाप्रतापसिंह चौक, परंडा येथे भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भारत मातेचे पुजन करून यात्रेची सुरूवात करण्यात आली. हि तिरंगा यात्रा महाराणाप्रतापसिंह चौक ते छ. शिवाजी महाराज चौकापर्यंत निघाली. सकाळ पासून पाऊसाची संततधार असुनही या यात्रेला मोठ्या संख्येने देशभक्त नागरिकांनी उपस्थिती लावली. यात्रेत देशभक्तांनी "भारत माता की जय", "वंदे मातरम् ", "सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्थान" अशा घोषणा दिल्या.
तसेच यावेळी छ. शिवाजी महाराज चौक येथे परंडा तालुक्यातील उपस्थित माजी सैनिकांचा सत्कार ठाकूरसाहेबांच्या हस्ते करून शुभेच्छा देण्यात आल्या. आणि उपस्थित बांधवांना मा.आ. ठाकूरसाहेबांनी संबोधित केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, माजी तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, परंडा न.प. माजी गटनेते सुबोधसिंह ठाकूर, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, जिल्हा चिटणीस विठ्ठल तिपाले, श्री. सुजित परदेशी, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील, ओ.बी.सी. मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव पाडुळे, ॲड. भालचंद्र औसरे, तालुका सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, माजी शहराध्यक्ष संदीप शहा, विठोबा मदने, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, शिवाजी पाटील, नागेश शिंदे, रमेश पवार, निशिकांत क्षिरसागर, परसराम कोळी, डॉ. अमोल गोफणे, अर्जुन कोलते, बाळासाहेब गिरी, अतुलसिंह ठाकूर, सतिश देवकर, रामदास गुडे, जयंत सायकर, तुषार नेटके, योगेश डांगे, सुदाम कापसे, शरद कोळी, सागर पाटील, पोपट सुरवसे, बाळासाहेब गोडगे, धनंजय काळे, गौरव पाटील, मनोहर पवार, सिध्दीक हन्नुरे, आदर्श ठाकूर, सुरज काळे, व्यंकटेश दिक्षित, हिमालय वाघमारे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा गायत्रीताई तिवारी, शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच तालुक्यातील सर्व माजी सैनिक, शहरातील नागरिक इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.