धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील प्रथमेश गायकवाड या शेतकऱ्याच्या मुलाने दहावी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवून उत्तुंग यश मिळवले आहे. त्याच्या या यशाबद्दल श्री श्री रविशंकर शाळेचे मुख्याध्यापक एस.एन. शिक्षक व वडिल विनोद गायकवाड, आई स्वाती गायकवाड, मामा किरण गरड सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. प्रथमेश हा सुरवातीपासूनच हुशार व मेहनती विद्यार्थी असून पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने यश संपादन केले होते. तरी त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शिक्षक, नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा वर्षाव होत आहे.