नळदुर्ग (प्रतिनिधी)-  नळदुर्ग शहरात सध्या 93 कोटी रुपये ची विकासकामे होत असून होत असलेली विकास कामे ही शहराच्या बाहेर असणाऱ्या वस्तीहीन भागात होत आहे. त्यामुळे या कामातून केवळ निधी खर्च करून गुत्तेदार जोपासण्याची कामे केली जात असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. दरम्यान आता तरी आमदार राणाजगजितसिंह पाटील हे नळदुर्ग मधील रस्त्याकडे लक्ष देतील काय असा प्रश्न विचारत आहेत. 

नळदुर्ग शहरात सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी नळदुर्ग शहरासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर करून आणला असून या विकास निधीतून सध्या शहरात व शहरातील वाढीव भागात जिथे वस्ती नाही अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहे. वास्तविक पाहता नळदुर्ग शहरातील शास्त्री चौक ते किल्ला गेट त्याचबरोबर राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते राष्ट्रीय महामार्ग आणि चावडी चौक ते बोरीघाट पर्यंत रस्ता होणे अत्यंत गरजेचे होते. परंतु याकडे मात्र पालिका प्रशासन आणि आमदार यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कारण शहराबाहेर अनेक भागात जिथे वस्ती नाही अशा ठिकाणी कोट्यावधी रुपयाची विकासकामे सध्या कृष्णाई कंट्रक्शन यांच्याकडून केली जात आहे. परंतु जिथे गरज नसताना अशा ठिकाणी मागणी न होता रस्ते आणि गटारीची कामे होत आहेत. 

मात्र नागरिकांकडून वारंवार मागणी करूनही चावडी चौक ते बोरीघाट नदीपर्यंत आणि शास्त्री चौक ते किल्ला गेट, राष्ट्रीय महामार्ग ते राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंतचे रस्ते हे नागरिकांसाठी अत्यंत गैरसोईचे झालेले आहेत. परंतु याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. दरम्यान वसंत नगर येथे स्मशान भूमी कडे जाणारा रस्ता त्याचबरोबर शिवकर वाडी परिसरात जखनी तांड्याकडे गरज नसताना रस्ते होत आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आता मंजूर झालेले रस्ते आहेत मात्र त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. असे रस्ते आता होणार की नाही यात शंका आहे. 

 
Top