धाराशिव (प्रतिनिधी)- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव येथे चारचाकी वाहनांसाठी 25 ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू होणार आहे. यानिमित्ताने आकर्षक आणि पसंतीच्या क्रमांकांसाठी नागरिकांकडून आगाऊ अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

नागरिकांनी 28 एप्रिल 2025 ते 29 एप्रिल 2025 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज,आवश्यक पत्त्याचा पुरावा (उदा. आधार कार्ड,लाईट बील) आणि विहित शुल्काचा डिमांड ड्राफ्ट ( Deputy Regional Transport Officer, Dharashiv यांच्या नावाने) सादर करावा लागणार आहे. डीडी फक्त राष्ट्रीयीकृत बँकेचा असावा व एक महिन्याच्या वैधतेचा असणे आवश्यक आहे.

एका क्रमांकाचे दोन किंवा अधिक अर्ज प्राप्त झालेल्या अर्जदारांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर 29 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल.

जर एका क्रमांकासाठी एकाहून अधिक अर्ज प्राप्त झाले,तर 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 12 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डावर अर्जदारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.त्यानंतर संबंधित अर्जदारांनी बंद लिफाफ्यात अतिरिक्त रकमेचा डीडी सादर करून लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल.अधिक रक्कम सादर करणाऱ्या अर्जदाराला तो क्रमांक प्रदान केला जाईल.एकदा राखून ठेवलेला क्रमांक बदलता येणार नाही.राखीव क्रमांक मिळाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत वाहनाची नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक आहे,अन्यथा क्रमांक रद्द होईल व शुल्क शासनात जमा होईल. कोणत्याही परिस्थितीत शुल्क परत मिळणार नाही.याबाबत अधिक माहिती आणि अर्जाचे नमुने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव येथे कार्यालयीन वेळात उपलब्ध आहेत,असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी कळविले आहे.

 
Top