तुळजापूर (प्रतिनिधी)-  चैञीपोर्णिमा कालावधीत शहरात सुमारे सत्तर ते ऐंशी हजार वाहने आले असुन या कालावधीत डुप्लीकेट पावती बुक माध्यमातून वसुली झाल्याची शक्यता आहे. तरी या बाबतीत प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचे काम पाहण्याचे पञ देण्याची मागणी केली असता वाहनतळ विभागाने कार्यालयीन काम पाहण्याचे पञ दिले आहे. तरी वसुली कर्मचाऱ्यांचे पावती बुक पाहण्याचे पञ मिळावे अशी मागणी रवि सांळुके यांनी केली आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी की,  वरील विषय संदर्भात रवि सांळुके यांनी एक महिनाभर दररोज वसुली कर्मचाऱ्यांचे पावती बुक पाहण्याची मागणी केली. त्याची 280 रुपये मनीआँर्डर ने भरले असता प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचे  काम पाहण्याचे पञ देण्याऐवजी  वाहनतळ विभागाने  कार्यालयीन काम पाहण्याचे पञ दिले आहे. तरी वसुली कर्मचाऱ्यांचे पावती बुक पाहण्याचे पञ मिळावे. तरी या मागणीचे मुख्याधिकारी यांनी दखल घेऊन वाहनतळ वसुली कामात पारदर्शकता आणावी अशी मागणी केली. चैञीपोर्णिमा कालावधीत सत्तर ते ऐंशी सहाचाकी वाहने आले असताना प्रत्यक्षात 11 ते 13 एप्रिल या कालावधीत  सात लाख रुपये जमा झाल्याची सांगितल्याची माहीती दिली. या पार्श्वभूमी वाहनतळ वसुली विषय शहरात चविष्टतेने चर्चली जाण्याची शक्यता वर्तवले जात आहे.

 
Top