धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये भारतीय संविधानकार, विश्व भूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
प्रथम मान्यवरांचा हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विचार आजच्या काळातही दिशादर्शक ठरत असून संविधानाने देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता या लोकशाहीच्या विचारांने देश विकसीत होत आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयांनी महामानव डॉ. बाबासाहेबां विषयी कृतार्थ असायला हवे, हा मोलाचा संदेश या निमित्ताने त्यांनी दिला.
यावेळी उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, बी.बी. गुंड, सुनील कोरडे, राजेंद्र जाधव, निखिल कुमार गोरे, धनंजय देशमुख, विनोद आंबेवाडीकर, मोहनराव शिंदे, 5 वी ते 12 वी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.