भूम (प्रतिनिधी)- श्री रामनवमी उत्सवानिमित्त कसबा येथील श्रीराम मंदीरात सकाळी 10 ते 4 या वेळेत रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 51 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले.
सकाळी दहा वाजता संस्थानचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मंदिरातील सभागृहात या शिबीराचा शुभारंभ करण्यात. रामनवमी उत्सवाची सांगता होती. या निमित्ताने महाप्रसाद व रक्तदान शिबीर घेण्यात आले धार्मीक कार्यक्रमासोबत सामाजिक उपक्रम व गरजु रुग्नाची रक्ताची गरज ओळखुन हे शिबीर घेण्यात आले. यासाठी संस्थानचे पदाधिकारी यांनी विषेश परिश्रम घेतले. या शिबिरासाठी कमला भवानी ब्लड बँक करमाळाचे निलेश पाटील, गणेश सपकाळ, संतोष यमकर, प्रिन्स शिंदे,अनुराधा आंधळकर, हुमेरा शेख,वैष्णवी घोडे यांचे सहकार्य लाभले.