तुळजापूर (प्रतिनिधी)-यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर चे इतिहास विभाग प्रमुख डॉ सतीश कदम हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न झाला.
बालाघाट शिक्षण संस्था संचालित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. सतीश कदम याच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर, प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, सत्कारमूर्ती महाराष्ट्र इतिहास परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश कदम, माजी प्राचार्य डॉ. जे .एस. मोहिते, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य रमेश नन्नवरे, आबासाहेब कदम, सुरज कदम, माजी नगरसेवक राजेश शिंदे, माजी नगरसेवक नागनाथ भांजी यांची याप्रसंगी उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या वतीने प्रा रमेश नन्नवरे यांनी प्रास्ताविक भाषण केले. या निमित्ताने नागनाथ भांजी, प्रा.शिवाजी शिंदे, प्रा संभाजी भोसले, सुरज कदम, प्रा . डी.जी जाधव, माजी प्राचार्य जे एस मोहिते, आदींनी डॉ सतीश कदम यांच्या शैक्षणिक काम आणि इतिहास संशोधन कार्य याविषयी गौरवपर भाषणे केली. कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड यांच्या भाषणाने झाला.
या निमित्ताने सत्कारमूर्ती डॉ. सतीश कदम यांनी बालाघाट शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने संशोधन कार्यामध्ये मला मोठे सहकार्य केले त्यामुळेच आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये संशोधन कामासाठी फिरू शकलो आणि इतिहासाचे संशोधन करत असताना विविध ठिकाणी व्याख्याने देऊन जनजागृती करू शकलो. इतिहासाचा दुर्मिळ ठेवा जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी अलीकडच्या काळात व्याख्याना बरोबर सोशल मीडियाने देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे देखील त्यांनी आपल्या भाषणांमधून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी जेटीथोर यांनी आणि आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ .नरसिंग जाधव यांनी केले. विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, कदम परिवाराचे हितचिंतक नातेवाईक, इतिहास संशोधनामध्ये कार्य करणारे संशोधक आणि विद्यार्थी या निमित्ताने या निरोप समारंभासाठी उपस्थित होते.