तुळजापूर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मान्य करण्या आलेल्या शंभर दिवस  दिवसांच्या कृती आराखडयाच्या अंमलबजावणीनुसार मंगळवार दि 29रोजी घेण्यात आलेल्या  दिवसीय हेल्थ चेकअप कँपमध्ये शंभर आडते, खरेदीदार, हमाल, बाजार समितीचे कर्मचारी, व शेतकरी बांधव  यांची तपासणी करण्यात आली.

या चेकअप कँम्पचेला  सकाळी 10.30वा आरंभ झाला. यात डॉ.वडणे, डॉ. करंजकर, दिपाली जगदाळे, तुषार दुधभाते, बेळंबर, मोहोळकर, चौधरी, सारंग देशमुख यांचा पथकाने तपासणी  केली.  सदर कार्यक्रमास  डी.जी.मोरे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, तुळजापूर, नगर परिषद तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, बाजार समितीचे सभापती अँड. आशिष सोनटक्के, उपसभापती सुहास गायकवाड, माजी सभापती विजय गंगणे, माजी सभापती, सचिन पाटील, संचालक संतोष कदम, बालाजी रोचकरी, दत्तात्रय वाघमारे, भाजप मंडल अध्यक्ष आनंद कंदले, धैर्यशिल दरेकर, राम चोपदार बाजार समितीचे सचिव उमेश भोपळे, बाजार समितीचे कर्मचारी,आडते,व्यापारी शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते.


 
Top