धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ.व्ही.पी. शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.पी.एज्युकेशनल कॅम्पस व मेगाट्रॉन मल्टीमीडिया पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिजाऊ, सावित्रीबाई व फातिमा शेख यांच्या प्रतिमेचे पूजन मेगाट्रॉनचे डायरेक्टर प्रा. दिपक वानखेडे, आर्ट डायरेक्टर प्रा.रेखा गायकवाड, प्राचार्य क्रांतिकूमार पाटील व प्रा. डॉ. गणेश मते यांच्या हस्ते करण्यात आले.कौशल्य विकास कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यानी कोणकोणत्या कौशल्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,स्किलचा विकास कसा करावा,फक्त टेक्नॉलजीवर प्रभुत्व असून चालत नाही त्याकरिता संभाषण कौशल्य,प्रेझेंटेशन स्किल,लेखन कौशल्य,सर्जनशिलता,निर्णय क्षमता,नेतृत्व गुण, वेळेचे नियोजन,तनाव हातळण्याची क्षमता असली पाहिजे असे अनमोल मार्गदर्शन मेगाट्रॉनचे डायरेक्टर प्रा. दिपक वानखेडे यांनी विद्यार्थाना केले.या कार्याशाळेस मिळालेल्या प्रतिसादाचे कौतुक डॉ. प्रतापसिंह पाटील व संस्थेचे मार्गदर्शक करण प्रतापसिंह पाटील यांनी केले.

या कार्यशाळेस आर पी फार्मसी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गणेश मते,प्रा. राम लोमटे, प्रा. विजय सुतार,प्रा. विक्रांत नवले,ग्रंथपाल रमेश मरगणे, भैरवनाथ फार्मसी महाविद्यालयाचे  प्रा. निखिल शेरखाने,प्रा. मोहीत पांढरे,प्रा. संजना जाधव,कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतिकूमार पाटील, प्रा. डॉ. मोहसीन शेख,प्रा. अशोक सोने, बी एड महाविद्यालायचे प्रा,सुकेशनी गव्हाने, प्रा. अजुम शेख, डेअरी डिप्लोमाचे प्राचार्य बालाजी वाघमारे, बालाजी मुंढे, आय टी आयचे प्रा.दत्तात्रय घावटे,सुनील पूदाले, सागर सुतार तसेच संकुलातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक मोठ्या संख्यने उपस्थित होते.  

 
Top