भूम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत नुकतीच उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार जयवंत पाटील, नायब तहसीलदार जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपूर्वी पार पडलेला आरक्षण सोडत कार्यक्रम गावपातळीवर उत्सुकतेचा विषय ठरला होता.

आरक्षण जाहीर करताना प्रशासनाने पारदर्शकता राखत सर्व नियमांचे पालन केले. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय तसेच सर्वसाधारण गटात आरक्षण निश्चित करण्यात आले.

आरक्षणानुसार ग्रामपंचायतींची यादी पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूचित जाती महिला- कानडी, जयवंतनगर, तांबेवाडी, दांडेगाव, मात्रेवाडी, अनुसूचित जाती पुरुष- उमाचीवाडी, जेजला, बावी, बेलगाव, हिवर्डा, अनुसूचित जमाती महिला-वाकवड, नागरी मागास प्रवर्ग महिला- आनंदवाडी, गिरवली, गोरमाळा, जांब, नळीवडगाव, बेदरवाडी, भोगलगाव, वांगी खुर्द, सावरगाव दे, हिवरा, नागरी मागास प्रवर्ग- आरसोली, इराचीवाडी, ईडा, गोलेगाव, डोकेवाडी, निपाणी, पखरूड, माळेवाडी, सावरगाव पा., सोन्नेवाडी, सर्वसाधारण महिला-अंजनसोंडा, आंबी, आष्टा, ईट, उळुप, गणेगाव घाटनांदुर, चांदवड, दुधोडी, देवळाली, पाठसांगवी, बऱ्हाणपूर, बागलवाडी, रामेश्वर, राळेसांगवी, वंजारवाडी, वडाचीवाडी, वारेवडगाव, वाल्हा, शेखापूर, सुकटा, सर्वसाधारण पुरुष-अंतरगाव, अंतरवली, अंदरुड, चिंचपूर ढगे, चिंचोली, चुंबळी, ज्योतिबाचीवाडी, तींत्रज, दिंडोरी, देवग्रा, नागेवाडी, नान्नजवाडी, पाथरूड, माणकेश्वर, रामकुंड, लांजेश्वर, वरुड, वांगी बु., वालवड, साडेसांगवी, सोनगिरी, हाडोंग्री.  या आरक्षण यादीमुळे तालुक्यातील अनेक नवीन चेहऱ्यांना सरपंचपदाची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काळात निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 
Top