भूम (प्रतिनिधी)-  भूम येथील बस स्थानका मध्ये महिला शौचालयामध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याने व सोय नसल्याने अडचण निर्माण होत आहे. शौचालयाच्या आजूबाजूला व सौचालयामध्ये पूर्णपणे घाणीचे साम्राज्य पसरले असून तेथील साफसफाई होत नसून कायम घाण पसरलेले असते. त्यामुळे महिलांना शौचालयात जाताना व गेल्यावर घाणीच्या साम्राज्याचा सामना करावा लागत आहे. शौचालयाच्या आजूबाजूची व शौचालयाची साफसफाई करण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे.

स्थानकातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये कधी पाणी असते तर कधी नसते. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बांधला आहे. मागील 15 दिवसापासून पिण्याचे पाण्याची अडचण आहे. बस स्थानकातील स्पीकर बंद आहे. त्याच्याकडे अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे. स्थानकातील उजव्या बाजूला कायम कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रवाशा करता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.


आगर प्रमुखाशी संपर्क साधला असता टाकी भरल्यानंतर टाकीतील पाणी सोडून देत आहेत. इतर लोक टाकीतील पाणी घेऊन जात आहेत. त्यामुळे टाकीमध्ये पाणी शिल्लक राहत नाही.

श्रीकांत सुरवसे

प्रभारी आगर प्रमुख


 
Top