तुळजापूर- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे शनिवार दि. 5 एप्रिल रोजी दुर्गाष्टमी दिनी श्री तुळजाभवानी मातेचा मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रम घेवुन उत्पती दिन (प्रकट दिन) साजरा करण्यात आला. शनिवार दुर्गाष्टमी दिनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा उत्पत्ती दिन म्हणजे प्रकट दिनानिमित्त श्री तुळजाभवानी मातेस दहीदुध पंचामृत अभिषेक महंत तुकोजी बुवा यांच्या हस्ते करण्यात आली. नंतर मंदिरासमोर भावीक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.या उपक्रम यशस्वीतेसाठी पुजारी बांधवानी परीश्रम घेतले.