धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते देविदास पाठक यांचा सत्कार करण्यात आला. देविदास पाठक यांची धाराशिव जिल्ह्याच्या मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सदर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
देविदास पाठक हे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी पत्रकारितेमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. त्याचबरोबर ते विद्यापीठाच्या विविध समित्यांवर कार्यरत आहेत. याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख म्हणाले. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना पाठक म्हणाले की,मी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा विद्यार्थी असून मला या महाविद्यालयांमध्ये संस्काराचे धडे मिळाले आणि त्यामुळेच मी सध्या विविध महत्त्वपूर्ण समित्यांवर काम करतो आहे. पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सक्षमपणे सांभाळू शकतो. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सह समन्वयक डॉ. संदीप देशमुख आणि सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.