धाराशिव (प्रतिनिधी)- इंजिनिअरिंग क्षेत्रात अजूनही नोकरीच्या संधी अनेक आहेत. त्यासाठी विद्यार्थी प्रयत्नशील असतात पण डिग्री बरोबरच नेमक्या कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे. यासाठी नुकतेच येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात एक्सपर्ट टॉकचे आयोजन केले होते. यावेळी क्रायसलिस करिअर इंटरप्रीनवरशिप स्किल पुण्याचे संचालक आणि तज्ञ मार्गदर्शक राजेंद्र कोरे हे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.
यावेळी बोलताना राजेंद्र कोरे म्हणाले की, नौकरी भरती संदर्भात मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी अनेक संधी असून बदलत्या काळाबरोबर विद्यार्थ्यांनी चालल्यानंतर नेमक्या संधी कोणत्या हे सहज लक्षात येते. सध्याची नवीन नौकर भरती ही ए आय मार्फत अर्थात आरटीफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःमधील स्किल सेट हा विकसित केला पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञानाला अवगत करून नोकरीमध्ये ज्या संधी आहेत त्या शोधण्यापेक्षा त्या संधीच तुमच्याकडे सहज उपलब्ध होतात. पण त्यासाठी स्वतःचा रिजुम वेळोवेळी अपडेट करता आला पाहिजे. अशा अद्यावत विद्यार्थ्याला कंपन्या स्वतः शोधत येतात. या एक्स्पर्ट टॉक साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने , महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे विभाग प्रमुख डॉ.डी डी दाते , महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अशोक जगताप ,विभागाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा आर ए दंडनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, महाविद्यालय सतत विद्यार्थ्यांना पदवी बरोबरच विविध कोर्सेसच्या माध्यमातून त्यांच्या मधील कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करत असते. जे विद्यार्थी याचा योग्य रीतीने अभ्यास करतात त्यांना शंभर टक्के नोकरीची हमी महाविद्यालयातर्फेच दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कौशल्य विकसित केली पाहिजे. यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे विभाग प्रमुख डॉ. डी डी दाते म्हणाले की मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही अभियांत्रिक क्षेत्रातील एक प्रमुख शाखा असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना कंपनी बरोबरच शासकीय नोकरी मधील सुद्धा अनेक संधी सहज उपलब्ध होत आहेत .फक्त विद्यार्थ्यांनी स्वतःचे ज्ञान अद्ययावत करणे गरजेचे असते. ही भूमिका लक्षात घेऊनच आपण दरवर्षी विविध तज्ञ व्यक्तींना इथे बोलवत असतो. याचाच भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यावेळी त्यांनी राजेंद्र कोरे यांचे विशेष आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.