तुळजापूर (प्रतिनिधी)- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प प्रकल्प अंमलबजावणी कक्ष - पणन संचालनालय, पुणे बाजार समित्यांची सन 2023-24 या वर्षाची वार्षिक क्रमवारी जाहीर झाली असुन यातराज्यस्तरीय स्मार्ट प्रकल्प अंतर्गत बाजार समिती गुणानुक्रमात तुळजापूर बाजार समिती राज्यात ३०५ बाजार समितीत १९ वा नंबर व धाराशिव जिल्ह्यात पहिला नंबर आलेला आहे.
लातुर विभागा अंतर्गत धाराशिव जिल्हयातील तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ला १४०गुण मिळुन राज्यात १९व्या स्थानी उमरगा ५१ मुरुम ५७ कळंब ५८ स्थानी धाराशिव ९६ व्या स्थानी वाशी १०९व्या स्थानी परांडा ११७व्या लोहारा १६३व्या स्थानी आले आहे. तुळजापूर कृषीउत्पन्नबाजारसमिती जवळ सोलापूर लातुर बार्शी कृषीउत्पन्नबाजारसमिती असुन ही राज्यात १९व्या स्थानी आले आहे. . कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अँड अशिष सोनटक्के सचिन उमेश भोपळे पाटील लेखापाल शिवानंद राठोड सह त्यांच्या सहकार्या माध्यमातून तुळजापूर कृषीउत्पन्नबाजारसमिती वर्षानुवर्षे राज्यात चांगले यश संपादन करीत आहे.