परंडा (प्रतिनिधी) - शेतकऱ्यांची आर्थिक नाडी समजल्या जाणारी तालुक्यातील सर्वात मोठी विविध कार्यकारी सोसायटी ही माजी आमदार कै.ज्ञानेश्वर पाटील यांच्या ताब्यात असून त्यांचे  खंदे समर्थक राहिलेले मा. नगरसेवक शब्बीर खान पठाण यांची निवड शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे.             

पठाण यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.सत्कार वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सामाजिक न्याय विभागाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे ,मा.नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.नवनाथ वाघमोडे, पिंपरखेड चे मा.सरपंच नागनाथ थोरात, न.प.चे निवृत्त कर्मचारी महेश कसबे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष गणीभाई हावरे ,राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम शिंदे ,जियाऊद्दीन वस्ताद मुजावर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट युवक शहर अध्यक्ष खय्युम तुटके, वाजिद पठाण, गोरख देशमाने आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पठाण यांची तज्ञ संचालक पदी निवड झाल्यामुळे शहर व तालुक्यातून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

 
Top