तुळजापूर (प्रतिनिधी)- स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस  धनंजय जाधव व युवा नेत्या पुजा मोरे यांनी  रविवार दि. 19 एप्रिल ररोजी तिर्थक्षेञ तुळजापूर ला येवुन श्रीतुळजाभवानी   मातेस साडीचोळी पुजा करुन पुरणावरणाचा नैवध  दाखवुन मनोभावे पुजा कुलधर्मकुलाचार  लग्नाची वावर जत्रा सहकुटुंब सहपरिवार  करुन आपल्या नव्या संसारी आयुष्य आरंभ केला. यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपरिक पुजारी धनाजी पेंदे यांनी केले श्रीतुळजाभवानी दर्शना नंतर  या नवविवाहीत दांम्पत्याचे स्वागत स्वराज्य संघटना  जिल्हाअध्यक्ष  महेश गवळी, स्वाभीमानी शेतकरी  संघटना जिल्हाअध्यक्ष रविद्र इंगळे मराठा क्रांती  मोर्चाचे कुमार टोले यांनी केले.

 
Top