उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील दाबका येथील तरुणाने खिशात चिट्टी लिहून मराठा समाजाला आरक्षण असे लिहून  प्रशांत गोविंदराव पवार (वय 40) याने शेतातील लिंबाच्या झाडाला (दि19) रोजी शनिवारी पहाटेच्या सुमारास  गळफास घेऊन आत्महत्या केली.

मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या तरुणांना मराठा समाजाला आरक्षण भेटत नसल्याने व हाताला रोजगार नाही असा मजकूर चिट्टी मध्ये लिहिला असून  घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचासमक्ष मयताच्या खिशातुन मराठा आरक्षनाला अनुसरून चिट्टी प्राप्त झाल्याची माहिती समोर येत आहे.

मराठ्यांना आरक्षण भेटत नाही:अशी चिट्टी मयताच्या खिशात आढळून आली आहे.प्रशांत गोविंदराव पवार यास एक मुलगा, एक मुलगी, अशी दोन अपत्ये असून त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी एक मुलगा आई वडील आणि भावंडे असा परिवार आहे.

 
Top