धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी खास फ्रेशर पार्टीचे आयोजन नुकतेच केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बीआयआर फिल्म से मालक धीरज देवन आणि क्रेडिट कंट्रोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सीनियर मॅनेजर अपर्णा देवण यांची प्रमुख उपस्थिती होती. या फ्रेशर्स पार्टी निमित्त महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामधून त्यांच्यातील असलेल्या कलागुणा मधूनच मिस्टर फ्रेशर आणि मिस फ्रेशर चा मुकुट विजेत्यांच्या शिरावर चढविण्यात आला . यावेळी झालेल्या कार्यक्रमांमध्ये पारंपारिक नृत्य, लोकसंगीत, लावणी, लेझीम,सोलो डान्स, ग्रुप डान्स,रॅप साँग अशा विविध कलागुणांनी विद्यार्थ्यांनी बहारदार असे कार्यक्रम केले. तसेच यावेळी क्रिकेट स्पर्धा ही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी घेण्यात आल्या .यावेळी क्रिकेट मध्ये कॅप्टन म्हणून आर्यन राजेभोसले आणि टीम आणि सायली भोरे टीम हे विजेते ठरले. चेस स्पर्धेलाही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी धीरज देवण मार्गदर्शन करताना म्हणाले की, मी स्वतःही या महाविद्यालयाचा विद्यार्थी असून या महाविद्यालयाने केलेल्या माझ्या वरील संस्कारामुळे आज देशभरामध्ये आमचा नावलौकिक असून मागे वळून फिरताना महाविद्यालयातील आठवणी अतिशय सुखद अनुभव देऊन जातात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील डिग्री बरोबरच आपल्यातील कलागुणांना विकसित करताना आशा कर्यक्रमाचा आनंद घेतला पाहिजे. पुढे बोलताना देवण म्हणाले की व्यक्तिमत्व विकास हा अत्यंत महत्त्वाचा भाग असून आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमीच तयार आहे आणि येत राहील. यावेळी धीरज देवण आणि अपर्णा देवण या दोघांनीही विशेष नृत्य करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. यावेळी झालेल्या मिस्टर फ्रेशर आणि मीस फ्रेशर या स्पर्धेसाठी 36 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यांच्यामध्ये तीन राउंड मधून त्यांच्यातील कला गुण व विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे मिस्टर फ्रेशर आणि मिस फ्रेशर हे किताब अनुक्रमे राहुल पवार आणि सायली भोरे यांनी मिळवले. तर दीक्षा चोपदार या विद्यार्थिनीला विशेष कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले . याप्रसंगी झालेल्या विविध स्पर्धांमध्ये 150 पेक्षा जास्त विद्यार्थी प्रत्यक्षात सहभागी झाले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की , महाविद्यालयामध्ये डिग्री बरोबरच विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं .यामध्ये विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविणे खूप आवश्यक आहे .कारण इथेच त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्यातील कलागुण विकसित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते. देशभरात नावलौकिक मिळवलेले विद्यार्थी आज या महाविद्यालयाचे देशाच्या कानाकोपऱ्यात काम करत असून त्यापैकीच धीरज देवण आणि अपर्णा देवण हे दोघेही अत्यंत व्यस्त शेड्युलमधून महाविद्यालयातील आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचेही आभार मानले.
बेसिक सायन्स अँड हुमानिटी विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख डॉ. उषा वडणे यावेळी बोलताना म्हणाल्या की, अभियांत्रिकीकडे वळलेले विद्यार्थी निश्चितच त्यांच्यातील कलागुणांनी आणि तंत्रज्ञानाने विकसित असलेले हुशार विद्यार्थी असतात. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाला कंगोरे देण्यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कार्यक्रमाचेही आयोजन महाविद्यालयामध्ये सातत्यपूर्ण केले जाते. अशा संस्कृतीक कार्यक्रमांमधूनच विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. आमचे विद्यार्थी आज देशाच्या कानाकोपऱ्यात चमकत आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो. मिस फ्रेशर आणि मिस्टर फ्रेशर या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रमुख अतिथी मिस्टर आणि मिसेस देवण आणि प्रा सुनीता गुंजाळ यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक पी एस तांबारे यांनी ही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी व सर्व कर्मचाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचाही कार्यक्रम आयोजित केला होता .त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला. या फ्रेशर्स पार्टीसाठी विभाग प्रमुख डॉ.डी डी दाते, डॉ.पी एस कोल्हे, प्रा.सुजाता गायकवाड,प्रा. पी एम पवार, प्रा.डी एच निंबाळकर, बेसिक सायन्स अँड ह्युमॅनिटी विभागाचे प्रा बालाजी चव्हाण, प्रा. मनोज जोशी,प्रा. दयानंद मुंडे ,प्रा.वर्षा पाटील, प्रा.आरती शिंदे, कार्यालयीन अधीक्षक हेमंत निंबाळकर, रामेश्वर मुंडे, सतीश नेपते, मंगेश धावारे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी ,प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.