तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉग्रस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पंतप्रधान यांना जम्मु कशमीर पहलगाम येथील आतिरेकी भ्याड हल्याचा तिव्र निषेध व्यक्त करुन निवेदन देण्यात आले. 

पहलगाम येथील आतिरेकी भ्याड हल्याचा केंद्र शासनाने जशैच तसे उत्तर द्यावे. अशी मागणी भारत सरकारकडे करण्यात आली व आतिरेक्यांना कंठस्थानात पोहचवावे. या हल्लयात जे नागरीक अडकून आहेत त्यांना सुरक्षीत  आप-आपल्या राज्यात परत आणावे. जखमीना योग्य उपचार देण्यात यावा. या पुढे असे दहशतवादी आतिरेकी हल्ला होऊ नये, यासाठी कडक पाऊले ऊचलावी. अशी मागणी करण्यात आली. या वेळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तोफीक शेख, युवक शहराध्यक्ष अक्षय परमेश्वर, शहर उपाध्यक्ष मकसुद शेख, शहर अध्यक्ष वाहेद शेख, अकाश शिंदे, अ.सं विधानसभा अध्यक्ष ईब्राहीम ईनामदार उपस्थीत होते.

 
Top