तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे शिक्षणाचे अग्रदुत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली,या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख व्याख्याते प्रा ज्योतिर्लिंग क्षीरसागर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशाला शिक्षणाच्या बाबतीत एक नवीन दिशा दिली. अज्ञानाच्या अंधकारमय विश्वात रममाण झालेल्या भारतीय समाजाला ज्ञानाच्या प्रकाशात घेऊन येण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. आपण महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो त्याचे कारणच मुळात हे आहे. तत्कालीन काळात ज्या अनिष्ट चालीरीती होत्या त्याचा प्रकर्षाने विरोध करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सारखी माणसं कार्यरत होती. त्यांना शिक्षणाची तहान होती त्याचे कारण हे होते की, शिक्षणातील असमानता त्यांना मुळातच मान्य नव्हती. भेदभावाच्या साखळ्या तोडण्यासाठी शीक्षण हीच प्रभावशाली गुरुकिल्ली आहे हे वेळीच त्यांनीं ओळखले होते म्हणूनच अगोदर स्वतःच्या पत्नीला शिक्षण देऊन भारतात स्त्री शिक्षणाची मूहर्तमेढ रोवली. आपल्याकडे निरक्षर आई घर वाया जाई असं म्हटलं जातं याचा परिणाम असा झाला की,1948 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली आणि प्रथम शिक्षिका झाल्या सावित्रीबाई फुले.“ विद्येविना मती गेली, मतीविनी नीती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले अस ते म्हणतात. याची प्रासंगिकता आपण समजून घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले तर आभार डॉ अनंता कस्तुरे मानले. यावेळी सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top