तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रभारी प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. 

सदर प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार, कृषीविषयक विचार व जातिय प्रथा या विषयावर डॉ पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच रासेयोच्या माध्यमातून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले,महाविद्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रेचे समापन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा विवेकानंद चव्हाण,प्रा बी जे कुकडे,प्रा जे.बी क्षीरसागर, प्रा एस पी वागतकर, कार्यालयीन अधीक्षक सुमेर कांबळे ग्रंथपाल दिपक निकाळजे यांच्या सह सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top