तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील रामवरदायनी शाळेत शनिवार दि26रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी जिजामाता नगर येथील आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी डॉ. यशश्री काळे, शहाजी आवटे यांनी कुष्टरोग प्रसार व उत्पती बद्दल माहीती सांगुन त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना सांगितले. त्यानंतर मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी परिचारीका अभिलाषा सुरवसे, आरोग्य अधिकारी सुधाकर कांबळे, कुष्टरोग तंत्रज्ञ शहाजी आवटे, आरोग्य पर्यवेक्षक आवळे सह जिजामाता नगर आरोग्य केंद्रातील कर्मचारी अदि उपस्थितीत होते.