तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षा 2024-25 मध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. 

या परीक्षेसाठी एकूण 29 विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी 11 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. त्यामध्ये गवळी गौरव (234), पाटील अर्जुन( 198), जमदाडे धीरज (182), नवगिरे सोहम (152), कुंभार कार्तिक (150), हुंडेकरी समाधान (144), पाटील त्रंबक (144), कापसे सोहम (142), केदार संस्कार (140),जाधव श्रेयस (136), चव्हाण सार्थक (132) या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे .सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्रीमान घोडके सर, पर्यवेक्षक डॉ. पेटकर सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदरील विद्यार्थ्यांना श्रीमती पाटील मॅडम, श्रीमती घुगे मॅडम, श्रीमती  साळुंके मॅडम, श्रीमती भिसे मॅडम, स्वामी, पडनुर, सावंत, सलगर, गोळेसर इत्यादींनी मार्गदर्शन केले. सदरील विद्यार्थ्यांचे विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.

 
Top