धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही. पी. एज्युकेशनल कॅम्पस मधील कृषी महाविद्यालयात झायडेक्स बायोफर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू कार्यक्रम पार पडला. सदर निवड प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाच्या अंतिम सत्रातील एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांमधून अंतिम सात विद्यार्थ्यांची निवड कंपनीच्या निवड समितीने केली.
झायडेक्स बायोफर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड ही जैविक कृषी निवेष्ठा उत्पादने आधारित अग्रगण्य कंपनी असून जैविक खत निर्मिती मध्ये मोलाची कामगिरी बजावत आहे. सध्याच्या बेरोजगारीच्या काळामध्ये महाविद्यालयाच्या अथक पाठपुराव्यातून झायडेक्स बायो फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी आमंत्रित करण्यात आले होते. कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये राऊत रवींद्र, बाराते सुनील, इंगळे यशोदीप, गव्हाणे चंद्रकांत, जाधव अजय, देशमुख पार्थ, देशमुख अभिषेक या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली सदरील निवड झालेले विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांच्या कंपनीच्या कार्यक्षेत्रात कंपनीचे कृषी क्षेत्र संलग्न काम पाहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी एक सक्षम रोजगार मिळवून देण्याचा उत्तम प्रयत्न महाविद्यालयाने सदरील उपक्रमातून दर्शविला आहे.
सदरील कॅम्पस प्लेसमेंट यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतिसिंह पाटील, महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्राध्यापक हरी घाडगे, प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. शेख मोहसीन, डॉ. गांधले अमित, डॉ. इंगळे रोहित, डॉ. खोसे प्रताप, प्रा. सुमिथा पाटील, प्रा. दळवे सतेश, प्रा. डोके आकाश, प्रा. माळी प्रवीण, प्रा. शेटे देवानंद, प्रा. भालेकर सुनील, प्रा. शिंदे अक्षय, प्रा. मुंडे नवनाथ, प्रा. गोटे प्रिया, प्रा. नागरगोजे विजय, सुतार रामचंद्र, मुजावर गुलाब, गिरी ओंकार यांनी मोलाची भूमिका बजावली.