तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीरात मंगळवार दि. 1 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता नाशिक येथील भाविक अभिषेक काकडे हे श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाला आले असता गर्दीत त्यांच्या खिशातील पॉकेट गहाळ झाले होते. मंदिर परिसरातील होमाजवळ कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक सचिन सोनवणे यांना ते पॉकेट सापडले. त्यांनी ते त्वरित दर्शन मंडप नियंत्रण कक्ष येथे जमा केले. अभिषेक काकडे या भाविकाची ओळख पटल्यानंतर त्यांना त्यांचे पॉकेट परत करण्यात आले. पॉकेट मध्ये 6410 रुपये इतकी रक्कम होती. सुरक्षा रक्षक सचिन सोनवणे यांच्या या तत्परते बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.