कळंब (प्रतिनिधी)- आज जगाच्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर बदल होत असूनही या बदलाच्या परिणामामुळे नवीन भारतीय पिढी संस्कृतीच्या बाहेर पडू नये यासाठी कार्य करण्याची गरज आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य सुरू आहे. असे प्रतिपादन हभप संदिपान महाराज हासेगावकर यांनी केले.
यावेळी त्यांनी तेर येथे वैराग्य महामेरू संत गोरोबा काका समाधी सोहळा उत्सवाचे दिनांक 23 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन केले. संदिपान महाराज हासेगांवकर यांनी दक्षिण मुखी हनुमान मंदिर कळंब येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह समाप्ती प्रसंगी काल्याचे किर्तन करीत असताना व्यक्त केले.
याप्रसंगी संदीपान महाराज यांनी किर्तन सेवेसाठी उत्तर मधुरभावातील तीन चरणाची गवळण किर्तन सेवेसाठी घेतली त्यांनी परमात्म्याची आराधना करीत असताना त्याच्याशी एकरूप झाले पाहिजे तर तो आपल्याला भेटतो याची परिचिती बाल लिलामधुन गोकुळातील गवळणीला आली होती असे सांगून आपल्या हृदयात दास्यभाव , स्वतंत्र भाव, शांत भाव, वात्सल्य भाव , मधुर भाव असे पाच भाव आहेत या विषयी त्यांनी सविस्तर मांडणी केली हनुमान जन्मोत्सवानिमित्त दक्षिण मुखी हनुमान मंदिर कळंब येथे अखंड हरिनाम सप्ताह 5 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत मान्यवर कीर्तनकारांनी आपली किर्तन सेवा अर्पण केली. 12 एप्रिल रोजी सकाळी 6.20 वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी हनुमान भक्ताची मोठी गर्दी होती भक्तांनी पेढे, तसेच लाडू प्रसादाचे वाटप केले तर सप्ताह समाप्ती निमित्त काल्याच्या कीर्तनानंतर माजी नगराध्यक्ष शिवाजी आप्पा कापसे यांची महाप्रसाद पंगत झाली , तसेच चैत्र द्वादशी निमित्त श्याम वाघमारे यांनी खिरीचा प्रसाद वाटप केला सप्ताह यशस्वी करण्यासाठी मुरलीधर चोंदे चत्रभुज आप्पा चोंदे, पांडुरंग माळवदे, आबासाहेब शिंदे गुरुजी ,शिवाजी भाकरे, प्रा. नवनाथ झाडके, पारायण वाचक ज्ञानेश्वर आंबीरकर, मीराताई चोंदे, परिमाळा घुले, जान्हवी पत्की यांनी परिश्रम घेतले.