नळदुर्ग- (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने लोकसभा व राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक 2025 मंजूर करून घेत लागू केला आहे. हे विधेयक व त्यातील तरतुदी संविधानच्या कलम 14, 15 (समानता)25 (धार्मिक स्वातंत्र) 26 (धार्मिक बाबीचे नियमन) 29 (अल्पसंख्याक हक्क) अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करीत असून देशात राहणाऱ्या नागरिकांच्या धर्म स्वतंत्र या मूलभूत अधिकारावरच गदा आणत आहे. 

तसेच व कायद्यातील बदल कलम (300 अ) मालमत्तेच्या अधिकाऱ्याच्या विरोधात आहे. तसेच देशात राहणाऱ्या जवळपास 30 कोटी मुस्लिम समाजाच्या हिताच्या विरोधात असल्याचे म्हणत या विधेयकचा निषेध करत वक्फ विधेयक तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी नळदुर्ग शहर मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढून अप्पर तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

वक्फ सुधारणा विधेयक तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी 15 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता किल्ला गेट येथून सुरूवात झाली. या मोर्चा क्रांती चौक, चावडी चौक भवानी चौक अहिल्यादेवी होळकर चौक, नगरपरिषद रोड मार्गाने अप्पर तहसील कार्यालय येथे आल्यानंतर या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. वक्फ बिल वापस लो, ताना शाही नही चलेगी नहीं चलेगी, जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद, इंकलाब जिंदाबादच्या घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी पवन भोकरे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चा व धरणे आंदोलनात हाफेज सय्यद मैनोद्दीन जहागीरदार, आलेम मोहम्मद रजा, हाफेज सय्यद नियामतुल्ला इनामदार,हाफेज फारुक अहेमद शेख,हाफेज अजीम इनामदार,हाफेज शफीक रजा,हाफेज मुसा जमादार,हाफेज मुद्दसर कुरेशी,हाफेज शब्बीर शेख,हाफेज खादर इनामदार, सय्यद शहा मोहम्मद इनामदार,फरहात इनामदार, रेहान शेख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, शहेबाज काजी, शरीफ शेख, इमाम शेख, मसूद शेख, मौलाना जाफर, सरफराज काझी, सलीम शेख, ताजोद्दीन सावकार, बशीर शेख,अफसर जाहगिरदार,अलीम शेख,गौस रजवी, मन्सूर शेख,गौस कुरेशी, वसीम कुरेशी, रिजवान काझी यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मोर्चा व धरणे आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळूंके, आनंद कांगूने,पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे, संतोष गीते जिविशाचे धनंजय वाघमारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

 
Top